लसीकरण न देणाऱ्या पालकांवर IPC अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे.

पुण्यात प्रॅक्टिस करतांना खूप व्यक्ती आणि वल्ली भेटतात ! तुमचे नशीब आहे ते किंवा प्रारब्ध हे मानून चालले की त्रास होत नाही 😝
आज सकाळची गोष्ट.
“मॅडम ,we don’t want to vaccinate our child !”
मी 🙁 डोक्यावर किलोभर बर्फ) why?
वल्ली :” we want to give him most natural immunity and not any artificial one !”
मी :” do u understand marathi ?”
(मला मातृभाषेत आवडते झाडायला 😉)
वल्ली :” हो पुण्याचा आहे मी !”
मी:” एक काम करा ! तुम्ही पुणे सोडा , जंगल शोधा आणि तिथे शिफ्ट व्हा , खळाळत्या ओढ्याचे पाणी प्या , आणि कंदमुळे खा ,भरपूर सूर्यप्रकाश अंगावर घ्या ,घरीच स्वतःपुरता भाजीपाला पिकवा आणि खा .मस्त मोकळी हवा झिरो कार्बन वातावरण असले की immunity वाढते आपोआप naturally मग तुम्ही कुठलेच लसीकरण घेऊ नका !😊
अशी जागा सापडल्यास मलाही कळवा ,मी पण येईन
आणि नाही जमले तर असला मूर्खपणा परत कधीच करू नका,जे काय प्रयोग करायचे ते स्वतःवर करा natural immunity चे ,बाळावर नाही , लसीकरण हा बाळाचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी त्याला मिळवून देणारच !😊(टिळक शिरले होते आज अंगात)😝

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *